गीत रामायणा वरील विवेचन - 35 - सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला

  • 2.7k
  • 972

शबरी श्रीरामाच्या दर्शनाने कृतकृत्य होते. एवढा काळ फक्त श्रीरामांच्या दर्शनासाठी तिच्या देहात थांबलेला प्राण अनंतात विलीन होऊन जातो. श्रीराम दर्शनाने तिचे मन तृप्त होते. श्रीराम व लक्ष्मण आजूबाजूच्या मुनीजनांच्या मदतीने शबरीचे योग्यप्रमाणे दहन करतात व पुढच्या मार्गाला जातात.कबंध राक्षसाने सांगितल्यानुसार श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताकडे वाटचाल करू लागतात. तिथे सुग्रीव व त्यांचे मंत्री हनुमान व इतर सहकारी राहत असतात. सुग्रीवाचे त्याच्या मोठ्या भावासोबत वालीसोबत वैमनस्य झालं असते त्याची कथा खालील प्रमाणे आहे:-[ एकदा एक राक्षस वालीला युद्धासाठी ललकरतो. ते ऐकून वाली त्याच्याशी युद्ध करतो. युद्धात आपण हरणार हे पाहून तो राक्षस पळून जातो. वाली पुन्हा आपल्या राजदरबारात येतो. काही काळाने