भगवद्गीता - अध्याय २

  • 7k
  • 2
  • 5k

संजय म्हणाला, करुणसागरात बुडालेला, डोळे अश्रुनी भरलेले व दु:खी अशा अर्जुनाला बघुन श्री भगवान म्हणाले हे असे विचार (कश्मल-पापाचे) यावेळी तुला कसे सुचले. हे नरवरा हे तुला शोभत नाहीत. याने तुला किर्ती किंवा स्वर्ग मिळणार नाही. पार्था हे अयोग्य आहे. ही षंढता नको. मनाची दुर्बलता सोडुन लढण्यासाठी ऊठ.अर्जुन म्हणाला, भीष्म,द्रोण हे वंदनीय व पुजेच्या योग्यतेचे आहेत. हे मधुसुदना मी त्यांच्याशी कशासाठी लढू हे मला सांग.महात्मा, गुरुंना मारण्यापेक्षा मी भीकेला लागेन. असे रक्ताने भिजलेले भोग काय कामाचे?. त्याना मारुन मी कोणती ईच्छा करू. आम्ही जिंकु किंवा नाही हे कोणास ठाऊक. मी श्रेष्ठत्व जाणत नाही. लढाईला तयार असलेल्या ध्रुतराष्ट्र पुत्राना मी मारु