किमयागार - 5

  • 5.2k
  • 3.5k

तो म्हातारा पाठ सोडत नव्हता. तो म्हणाला तो खुप थकलाय आणि तहान लागलीय आणि म्हणाला मला थोडी वाईन देशील का?. त्याने म्हाताऱ्याला बाटलीचं दिली म्हणजे तो एकदाचा जाईल. पण त्या म्हाताऱ्याला बोलायचेच होते .त्याने विचारले तू कोणते पुस्तक वाचतोयस?. खरेतर त्याला एवढा राग आला होता की वाटले बाकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसावे पण ते उद्धटपणाचे वाटले असते, त्याच्या वडिलांनी त्याला मोठ्या माणसांचा आदर करण्यास शिकवले होते. मग मुलाने पुस्तक त्याच्या हातात दिले. पुस्तक देण्याची दोन कारणे होती, एक म्हणजे त्याला स्वत:ला‌च त्या पुस्तकाचे नाव उच्चारता येईल की नाही याची खात्री नव्हती, दुसरे म्हणजे त्या म्हाताऱ्याला वाचता येत नसेल तर तो