चांगल्या स्वरुपाचं लेखन व्हावं लेखनात दम असतोच. लेखणी अशी गोष्ट आहे की ते लेखन चांगल्या चांगल्या लोकांना धराशायी करीत असते. तसंच लेखन चारचौघात बसवीत असते तर कधी कधी लेखन चारचौघातून उठवत असते. लेखकाचं लेखन म्हणजे एक विचारच असतो. मनातून आलेलं व कागदावर प्रतिबिंबीत झालेलं. लेखक लेखन करतो, त्याला खुशी होते म्हणून नाही तर तो एक समाजाचे देणं लागतो म्हणून. ते आपल्या लेखनीतून समाजाचक एक प्रकारे सेवाच करीत असतात. तो ऋणकर्ताच असतो समाजाचा आणि आरसाही. त्यानुसार तो लोकांना चांगुलकीची वाट दाखवीत असतो. त्याच्यासमोर शब्द हात जोडून उभे राहतात. म्हणत असतात की माझा वापर करा. परंतु लेखक प्रत्येक शब्दाला वापरेल तेव्हा ना.