चांगल्या कामाची किंमत व्हावी

  • 3.4k
  • 1.5k

चांगल्या कामाला किंमत नाही? "गुरुजी, आता तरी चपला घालाल काय?" पत्रकारानं एका गुरुजींना विचारलेला प्रश्न. त्या गुरुजींनी आपली पादत्राणे त्यागली होती. त्याचं कारणही तसंच होतं. ते होतं, त्यांनी केलेलं महान कार्य. जे कार्य त्यांनी केलं होतं, त्या कार्याची दखल जरी घेतली असली तरी त्या शिक्षकाची दखल न घेतली गेल्यानं तसेच त्यांच्यात दोष दाखवून त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर संबंधीत शिक्षकानं पादत्राणे त्यागली. शेवटी जेव्हा त्यांना दोषातून मुक्ती मिळाली, त्यानंतर पत्रकारानं त्यांना विचारलेला प्रश्न. त्यावर गुरुजीनं अतिशय शांत राहून उत्तर दिलं, "नाही, मी अजिबात चपला घालणार नाही. कारण माझ्या विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान झालंय." चपला घालणे न घालणे हा त्यावरचा उपाय नाही.