किमयागार - 4

  • 6.3k
  • 4.6k

म्हातारी जरा वेळ शांत बसली मग परत त्याचा हात हातात घेऊन गंभीरपणे पाहू लागली. " मी तुझ्या कडून फी घेणार नाही पण तुला मिळणाऱ्या खजिन्यातील दहावा हिस्सा तू मला दे". त्याला मनातून हसू आले , चला या खजिन्याच्या स्वप्नामुळे आपले पैसे आत्ता तरी वाचले. 'ठिक आहे, स्वप्नाचा अर्थ सांग' तो म्हणाला. ' तू आधी शपथ घे की आता मी तुला जे काही सांगणार आहे त्याचा मोबदला म्हणून तू खजिन्याचा दहावा हिस्सा देशील. त्याने शपथ घेतली. तीने परत प्रभू येशू कडे पाहून शपथ घेण्यास सांगितले. मी याचा अर्थ सांगू शकते पण ते खूप कठीण काम आहे म्हणून मला वाटते की तुला