सायलेन्स प्लीज - प्रकरण 8

  • 4.6k
  • 2.8k

प्रकरण 8 पाणिनी ला कनक ओजस त्या घरा बाहेर त्याच्या गाडीत बसलेला दिसला. “ मला आत नाही येऊ दिले पोलिसांनी.” तो म्हणाला. “ काय घडलं तिथे? ”“ बरंच काही ” पाणिनी म्हणाला. “ राजे नावाच्या त्या घरात राहणाऱ्या एका चा खून झालाय. तो अंथरुणात असतानाच रात्री चाकू ने भोसकून. त्याच्या अंगावर असलेल्या पांघरुणावरूनच त्याला भोसकलय ”“ खुनाचा हेतू ? ” ओजस ने विचारलं.“ परिस्थितीजन्य पुरावा माझ्या अशिलाच्या, विहंग खोपकर च्या विरोधात आहे.”“ तो आहे कुठे अत्ता? ” ओजस ने विचारलं.“ व्यावसायिक कामासाठी बाहेरगावी गेलाय.” पाणिनी म्हणाला.“ तू त्याला पोलिसांसमोर हजर करणार आहेस? ”“ ते इतर अनेक गोष्टीवर अवलंबून राहील.” पाणिनी