सायलेन्स प्लीज - प्रकरण 7

  • 5.1k
  • 3.2k

प्रकरण 7 त्या प्रशस्त घराच्या फरसबंदी केलेल्या अंगणात पाणिनी आर्या ला हलक्या आवाजात सूचना देत होता. “ काहीही झालं तरी खांडवा चा मुद्दा कोणालाही समजता कामा नये. तुझ्या विहंग मामा ला पुढचे दोन अडीच तास आपल्याला पूर्ण सुरक्षित ठेवायला लागणार आहे.” “ ते त्याला इथे ओढत घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय?” तिने शंका विचारली “ त्यांना प्रश्न विचारायचे असणार विहंग ला.” पाणिनी म्हणाला “ पोलिसांनी मला अत्ता त्याच्या बद्दल विचारलं तर काय सांगू मी? ” आर्या म्हणाली “तो कुठे आहे ते मला माहीत नाही असे सांग.” “ मी सांगते की मी खांडवा ला मुक्काम केलं आणि बस ने घरी आले.”