लॉक डाऊन मधील हळदीकुंकू

  • 7.1k
  • 1
  • 2.7k

आमच्या सोसायटीतल्या सगळ्या महिलांनी सोशल डिस्टनसिंग पाळून का होईना पण दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी जरी सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरीही योग्य ती खबरदारी घेऊन क्लब हाऊस मध्ये हळदी कुंकू करायचं ठरवलेच. दरवर्षी हळदी कुंकवाच्या प्रोग्रॅम ला आम्ही काही ना काही उपक्रम राबवतो. जसे मागच्या वर्षी वृक्षारोपणाचे महत्व समजावून देणारं आम्ही एक छोटं नाटक बसवलं होतं आणि सगळ्यांना वाण म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे रोपं दिले होते. ह्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून घरगुती मास्क बनवले व ते विक्रीसाठी ठेवले त्यातून जे पैसे मिळाले त्यातून आम्ही रस्त्यावर कचऱ्याच्या पिशव्या विकणाऱ्या लहान मुलांना कपडे आणि खाऊ चे पॅकेट्स घेऊन त्यांना वाटले. त्याशिवाय ह्यावेळेस सारखं