पराजित अपराजित

  • 10.2k
  • 3.5k

ऑपरेशन ऐंटेबी नंतर मी वाचले ते पराजित अपराजित. श्री.वाळींबे एक मुरब्बी लेखक आहेत. त्यांची लेखनशैली मला आवडते. 'पराजित अपराजित' म्हणजे १८७० ते १९७० पर्यंत चा फ्रेंच देशाचा इतिहास होय. या पुस्तकाचा पुर्ण आढावा घेणं शक्य नाही तसेच या पुस्तकातून आंतरराष्ट्रीय राजकारणावर जो प्रकाश पडतो तो समजून घेण्यासाठी त्या पुस्तकातील उतारे लिहिणे महत्त्वाचे ठरते परंतु एकंदरीत मत आणि काही खास प्रसंग लिहिणार आहेपुस्तक वाचुन झाल्यानंतर असे वाटते की ज्या राष्ट्राला असे पराजित, कचखाऊ नेते लाभत गेले ते एक बलाढ्य राष्ट्र कसे झाले?. अर्थात अधुनमधून लाभणारे समर्थ नेतृत्व हे त्याचे कारण असेल, संपूर्ण विनाश होईल असे वाटत असताना एखादा अपराजित वृत्तीचा नेता