सीता गीत (कथामालीका) भाग ३

  • 3.9k
  • 1.9k

समुद्र पार करण्यासाठी मारुतीने मोठी उडी मारली व तो त्याच्या पुण्याईमुळे सागरात न बुडता लंकेमध्ये पोहोचला व त्याने लंकापुरीत सर्वत्र शोध घेतला व अशोक वनात पोहोचला. रात्री तो रावण मी वश व्हावे म्हणून आर्जव करीत बडबड करत होता पण मी त्याच्याकडे लक्षच देत नव्हते. शेवटी तो ' मेला ' राक्षसींना म्हणाला ही जर दोन मासात तयार नाही झाली तर तीला मारून मांस खायला द्या. असे म्हणून रावण तीथून गेला. हनुमंताला हे पाहून दु:ख झाले. मारूतीने हळूच गुणांचा सागर अशा श्रीरामाचे वर्णन सुरू केले व माझ्या समोर येऊन रामनाम असलेली अंगठी ( मुद्रा ) दाखवली. ती मुद्रा बघताचं माझ्या हृदयाला शांतता