किमयागार - 2

  • 7.2k
  • 5.4k

आणि आता चारचं दिवसात तो त्या गांवात पोहोचणार होता. त्याच्यात एक वेगळाच उत्साह आला होता. पण त्याचवेळी त्याला असे वाटत होते की ती मुलगी आपल्याला केव्हाच विसरली असेल. असे कितीतरी मेंढपाळ रोज जात येत असतात. तो मेढ्यांना म्हणाला , विसरली असेल तर विसरू दे, मला इतरही मुली माहित आहेत. पण त्याचे मन मात्र त्याला सांगत होते की नाही असे होणार नाही. मेंढपाळ, खलाशी व फिरते विक्रेते याना नेहमीच कोणीतरी असे भेटतं असते जे त्याना प्रवासातील आनंद विसरायला लावते.दिवस उजाडायला लागला होता, त्याने मेंढ्याना उगवतीच्या दिशेने वळवले. त्याच्या मनात आले मेंढ्या कोणताच निर्णय घेउ शकत नाहीत आणि म्हणूनच त्या माझ्यावर अवलंबून