सायलेन्स प्लीज - प्रकरण 6

  • 5.4k
  • 3.2k

प्रकरण 6 पाणिनी ने दचकून उशी खाली फेकली. आर्या एकदम किंचाळायला लागणार तोच पाणिनी ने तिच्या तोंडावर हात ठेवला. “ओरडून उपयोग नाही.” पाणिनी म्हणाला “ त्यापेक्षा शांत राहून आपण कुठल्या स्थितीत सापडलोय याचा अंदाज घ्यायला पाहिजे.” तो म्हणाला. “ पण... पण....रक्त लागलंय त्याला.....” ती दबलेल्या आवाजात म्हणाली. पाणिनी ने बाहेर पॅसेज मधे डोकावून अंदाज घेतला. डॉक्टरांच्या खोलीपाशी आला आणि दार ठोठावले. आतून कडी काढल्याचा आवाज आला.दाढी करताना गालाला साबण लावलेल्या अवस्थेत ते बाहेर आले. “ खाली नाश्त्याच्या वासानेच मी उठलो. तुम्ही आला नसतात तरी मी येणारच होतो.” खेर म्हणाले. “ आम्ही त्यासाठी नाही वाजवले दार. तुम्ही तोंड धुवा आणि लगेच