सायलेन्स प्लीज - प्रकरण 4

  • 5.3k
  • 3.3k

प्रकरण 4 लीना माईणकर उंच,सडपातळ,मन मोकळी आणि प्रथम दर्शनी आवडणारी होती. “ पटवर्धन, मी विहंग पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे.त्यामुळे मी पैशासाठी लग्न करणार आहे असे कोणालाही वाटू शकतं.मी तुम्हाला शब्द देते की विहंग खोपकर च्या हिताचे जे काही असेल अशा कोणत्याही कागद पत्रावर मी सही करीन.” पटवर्धन समाधानाने हसला. “ विहंग चा सावत्र भाऊ वदन राजे याच्याशी तू हा विषय बोलली आहेस का? ” “ नाही बोलल्ये.त्याला मी आवडत नाही.आर्या चा प्रियकर हर्षद आणि त्याचं चांगलं जमतं.” तेवढ्यात विहंग खोपकर लीना ला पार्टी साठी घेऊन जाण्यासाठी आला. “ तुझ्या कडून मला एक अॅफिडेव्हिट करून घ्यायचंय कोर्टात सादर करण्यासाठी.”पटवर्धन म्हणाला.