सायलेन्स प्लीज - प्रकरण 3

  • 5.6k
  • 3.6k

प्रकरण तीन पाणिनी पटवर्धन फोन वर डॉ.खेर यांच्या शी बोलत असतानाच ओजस आत आला. “ तू माझी वाट बघतोयस असं सौम्या म्हणाली.”- पाणिनी ने फोन वर बोलता बोलताच मान डोलावली आणि ओजस ला बसायला खुणावलं. “ झोपेत चालण्याच्या सवयी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे डॉक्टर त्रिगुण खेर ? ” पाणिनी म्हणाला . “ तुमच्या साठी माझ्याकडे एक रुग्ण आहे.रात्री हातात चाकू घेऊन झोपेत चालतो तो.घरा भोवती फिरतो,अनवाणी. आपण आज भेटणार आहोत त्याला रात्री. मी तुम्हाला साडेसातला फोन करतो.तुम्ही त्याला तपासावं.त्याच्या बायकोचे म्हणणे आहे ,तो वेडा आहे. ठीक ,ठीक. मी तुम्हाला क्लब मधून घेतो.आपण एकत्रच जाऊ. ” “ झोपेत चालण्याची भानगड