अशी केली मात

  • 4.1k
  • 1.5k

अशी केली मात मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, आणि महाराष्ट्रची राजधानी, म्हणजे एक स्वप्ननगरी अश्या या मायानगरीत सर्व जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या प्रांतातून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आनंदाने राहतात. त्यात कोणाचे स्वप्न पूर्ण होते, तर कोणी प्रयत्न करत असतो. असेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधून एक गजानन सावंत नावाची व्यक्ती आपल्या मामाच्या घरी रहायला येते. काळ 70 ते 80 च्या दशकातील असतो. गजानन मामाच्या घरी येतो तेव्हा त्याचे शिक्षण पूर्ण झालेले असते. गजानन हा खूप हुशार असतो. गजाननचे वडील गावामध्ये मच्छीमार असतात. गजाननचा मोठा भाऊ त्यांना त्या कामात मदत करत असे. पण गजाननला त्यात जराही रस नसतो. म्हणून तो