सायलेन्स प्लीज - प्रकरण 1

  • 15k
  • 8.6k

सायलेन्स प्लीज......... प्रकरण १ पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस च्या दारात एक विलक्षण देखणी तरुणी उभी होती. “ सॉरी , पटवर्धन, मला दहा पंधरा मिनिटं उशीर झाला .” ती ओशाळून म्हणाली. “ अठरा मिनिटं ” पाणिनी म्हणाला. “ इथे आल्यावर आमच्या पद्धती प्रमाणे तुमची आणि कौटुंबिक माहिती, भेटायचं कारण, हे सगळं सौम्या कडे लिहून दिलंय ना? ” तेवढयात सौम्या हातात कागद घेऊन आली आणि पाणिनी कडे तो दिला. “ मी हा कागद तुम्हाला देण्या पूर्वीच ही आत आली.” ती म्हणाली. “ ठीक आहे असू दे.” पाणिनी म्हणाला. “मला खाजगी बोलायचं आहे.” ती सौम्या कडे बघून म्हणाली. “ सौम्या सोहोनी ही माझी