प्रेमाचे रहस्य - 1

  • 9.5k
  • 1
  • 3.8k

“त्या घरात ते तिघे होते, तर मग त्याला कोणी मारले?” ज्युलियन डँमान मला विचारत होता. “सोपे आहे सर. तिचे लग्न जो हॉपकिन्स शी झाले होते पण अँटोन तिचा प्रियकर होता व तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते”, मी नेहमीप्रमाणे एक ढोबळ विधान केले. त्या टेकडीवर ते एकच घर होते, पण? त्या घरात ते तिघे म्हणजे मौसियर जो हॉपकिन्स, त्यांची पत्नी मादाम अँजेना व तिची नणंद म्हणजेच मौसियर जो यांची बहीण जेनिफर राहत होते. “सर, माझी मैत्रिण बार्बरा मला काल भेटली तेव्हा ती ही त्याच प्रकरणावर बोलत होती”, मी म्हणालो. “पण ऐलेन, मौसियर जो हॉपकिन्सना त्यांच्या पत्नीचे हे चोरटे प्रेमप्रकरण माहित नव्हते