क्राईम पेट्रोल

  • 5.4k
  • 2.2k

क्राईम पेट्रोल पुणे जिल्ह्य़ातील टिळक नगर पोलीस ठाण्यात पोलीस इन्स्पेक्टर सुधाकरराव चार्ज घेण्यासाठी पोलीस ठाण्यात येतात. त्याचवेळी एक फोन येतो. समोरील व्यक्ती सुधाकरराव यांना सांगतो, की अप्सरा जिममध्ये एका मुलाने आत्महत्या केली आहे, तुम्ही लवकर या! फोन ठेवल्यावर सुधाकरराव घटनास्थळी जातात. त्याठिकाणी एका 18 ते 20 वर्ष वयाच्या मुलाचा मृतदेह पडलेला असतो. त्या मुलाच्या हातात एक बाटली असते. तसेच मुलाच्या तोंडामधून फेस येत असतो. सुधाकरराव समजून जातो की विष पिल्याने हा मेला आहे. सुधाकरराव बॉडीला चेक करून, बॉडी पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पाठवून देतो. हातात असलेल्या बाटलीला पुरावा पिशवी मध्ये ठेवायला सांगतो. सुधाकरराव केसची सूत्रे हाती घेतो......... चौकशी करण्यासाठी तयारी सुरू करतो.