झोका - भाग 4

  • 8k
  • 5.4k

सुधाने फोन उचलला. "हॅलो",सुधा"हॅलो सुधा नीट ऐक, आज रात्री मला इथेच राहावं लागेल, इमर्जन्सी केस आहे त्यामुळे मी उद्या सकाळीच येईल घरी. रात्री सोबतीला गुंजाला बोलावून घे, मी खंडूला सांगून ठेवतो.जास्त विचार न करता लवकर झोपून जा,उद्या सकाळी येतोच मी लवकर,ठीक आहे!",सुरेंद्रसुधा ला क्षणभर काही सुचलंच नाही काय बोलावं ते."अगं सुधा! ऐकतेय न! तुझ्याशी बोलतोय मी!",सुरेंद्र"अं हो हो, ठीक आहे",सुधा पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला."काय झालं वैणीसायेब? कोनाचा व्हता फोन?",गुंजा"अगं डॉक्टरांचा, ते आज रात्री येऊ शकणार नाहीत घरी, इमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये, तू येशील का सोबतीला माझ्या आज रात्री",सुधा "बापरे! रातीला! तसं भेव वाटते मले पन तुमच्या संगतीला येतो, आज रातभर