वल्डकप फायनल - भाग १ व २

  • 5.2k
  • 2.3k

वल्डकप फायनल या पुस्तकाविषयी वल्डकप फायनल ही पुस्तक वाचकांपुढे देतांना मला नेहमीसारखाच आनंद होत आहे. ही एका कलाकाराला वाहिलेली पुस्तक असून यातील पात्र व कल्पना ह्या काल्पनीक आहेत. ही पुस्तक लिहिण्यामागं माझ्या कल्पनेत होता देशातील सैनिक. सैनिक हा देशासाठी लढतो. अन् लढता लढता एखाद्या गोळीनं तो अपंग होतो. मग तो लढू शकत नाही. त्याला पेन्शन सुरु होते व तो जगतो. मला युद्धभुमी दाखवायची होती व परिस्थितीही दाखवायची होती त्या सैनिकाची. मात्र ही पुस्तक लिहिण्यासाठी जी कल्पना केली होती. त्यात पेन्शन द्वारे मिळणारा पैसा आड आला. म्हणूनच मी या माझ्या पुस्तकात एक क्रिकेटर उभा केला. अशातच भारत वल्डकप फायनल हारला होता.