झाले गेले विसरून जावे..

  • 4.8k
  • 1.6k

झाले गेले विसरून जावे... माझे एक खूप आवडते गाणे आहे....'झाले गेले विसरून जावेपुढे पुढे चालावेजीवनगाणे गातच रहावे'माणसाच्या आनंदी जीवनाचे सार या गाण्यात अगदी मोजक्या शब्दात सांगितले आहे ... 'सर्जेराव आणि गणपतराव ही एका गावातली दोन मातब्बर माणसे,दोघेजण एकेकाळचे अगदी जीवाभावाचे मित्र होते.गावाची सगळी सत्ताकेंद्रे या दोन घराण्यांच्या ताब्यात होती. आज मात्र या दोघांच्यात प्रचंड शत्रूत्व आहे. झाले असे की, एका वर्षी गावातल्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीत सर्जेरावांचे बैल गणपतरावांच्या बैलांच्यापुढे गेले आणि गणपतरावांना तो त्यांचा अपमान वाटला.या दोघांची मैत्री आधीपासून खुपत असलेल्या गावातल्या लोकांनी पध्दतशीरपणे या दोघांच्यात वितुष्ट वाढण्यासाठी प्रयत्न केले आणि वर्षानुवर्षे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे हे दोन मित्र एकमेकांना