मर्डर वेपन - प्रकरण 18 - शेवटचे प्रकरण

  • 4.5k
  • 1
  • 2.4k

प्रकरण १८ ( शेवटचे) दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट सुरु झालं. “ पटवर्धन यांच्या विनंतीनुसार कोर्टाने मिसेस मिर्लेकारांना समन्स काढलंय आणि त्या कोर्टात हजर आहेत. ” न्यायाधीश म्हणाले. “ तुम्ही तुमचं काम चालू करा पुढे,मिस्टर पटवर्धन.” पाणिनी उठून उभा राहिला. “मी काल म्हणालो होतो की मला मिसेस मिर्लेकारांची साक्ष घ्यायची आहे, पण त्यापूर्वी मी आधी कालचे निवेदन पूर्ण करतो.आणि मग साक्षीला सुरुवात करतो.” पाणिनी म्हणाला. “ तर,युअर ऑनर, खून मिर्लेकरने केला नसला तरी तो त्याच्या अशा साथीदाराने केला आहे की जो खून करण्यावाचून त्या व्यक्तीला गत्यंतरच नव्हते. किंबहुदा ती व्यक्ती खून करेल या अटीवरच मिर्लेकर रायबागीच्या ऑफिसात मोठा अपहार करायला तयार