भाग्य दिले तू मला - भाग ८

(2.2k)
  • 9.5k
  • 6.8k

मध्यरात्रीचा ठोका उलटला होता. स्वराच्या दारावर थाप पडली आणि ती धावतच दारावर पोहोचली. तिने दार उघडले होतेच की कियारा आणि काही मैत्रिणी मोठ्याने ओरडत म्हणाल्या, " सरप्राइज ! हॅपी बर्थडे स्वरा मॅडम. " स्वरा त्यांच्या सरप्राइजने आनंदून गेली होती. ती त्यांना बघतच होती की सर्व तिला बाजूला करून आतमध्ये पोहोचले. पूजाही ह्या प्लॅन मध्ये सामील झाली होती त्यामुळे ती झोपेतून अलगद उठली. तिने येऊन स्वराला घट्ट मिठी मारली आणि खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्वरा दारातून हे सर्व पाहतच होती की सर्व मुलींनी रूम मध्ये घोडका केला. त्यांनी केक आधीच मागवून हॉस्टेलच्या किचनमध्ये ठेवला आणि बारा वाजताच हळूच घेऊन आले. केकसोबतच