गीत रामायणा वरील विवेचन - 1 - गीत रामायणावरील विवेचन

  • 12.4k
  • 7k

।।श्रीराम श्रीराम श्रीराम।। वाचकांनो आज मी ग.दि.माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित लिहिलेल्या गीत रामायणावर यथाशक्ती विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ग.दि माडगूळकरकरांनी एकूण छप्पन गीतांत क्रमाने संपूर्ण रामायणाचे प्रसंग वर्णन केलेले आहेत. त्यातील आजपासून रोज एकेक गीत घेऊन मी त्यावर विवेचन करणार आहे. वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल ह्याची मला खात्री आहे. त्यातील पाहिलं गीत आहे स्वये श्री रामप्रभू ऐकीती एका परिटाच्या संदेहामुळे श्रीरामप्रभु सीतामाईंचा त्याग करतात त्यावेळी त्या गरोदर असतात हे श्रीरामप्रभूंना माहीत नसते. श्रीरामाच्या आदेशावरून लक्ष्मण सीता माईला ऋषी वाल्मिकीनच्या आश्रमात नेऊन सोडतात. तिथेच सीतामाई एखाद्या तपस्विनी योगिनी प्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. तेथे लव आणि कुश ह्या जुळ्या मुलांचा