मर्डर वेपन - प्रकरण 13

  • 4.3k
  • 2.4k

प्रकरण १३जेवण्याच्या सुट्टीत सौंम्या,कनक आणि पाणिनी हॉटेलात बसले होते.“ पाणिनी,मला टिप मिळाली आहे की दुपार नंतर ते तुला काहीतरी धक्का द्यायच्या तयारीत आहेत.” कनक ओजस म्हणाला.“ काय आहे नेमकं?” पाणिनीने विचारलं“ ते नाही समजलं.”“ कनक, तुझ्या लक्षात आलं का अंगिरस खासनीस कुठलातरी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ नये या काळजीत पडलेला होता.जेव्हा तो प्रश्न त्याला न विचारताच चंद्रचूड यांनी तपासणी थांबवली,तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर संकटातून सुटल्याचा भाव होता. बर,ते असू दे.उत्क्रांत उद्गीकर बद्दल काय? ” पाणिनीने विचारलं“ तो कॉन्ट्रॅक्टर आहे.पंचावन्न वय आहे.विधुर आहे.त्याच केरशी शहरात घर आहे.घराचा मागचा भाग तो भाड्याने देतो,नेहेमी.त्याला एक मुलगी आहे ती कॉलेज ला आहे.बाहेर गावी राहते.”कनक ने