मर्डर वेपन - प्रकरण 10

  • 4.5k
  • 2.4k

प्रकरण १० ऑफिसात आल्यावर पाणिनी बराच विचारात पडला होता. बेचैन होऊन इकडून तिकडे फिरत होता. “ सौंम्या, पद्मराग रायबागीनेत्याच्या आयुष्यात दोन रिव्हॉल्व्हर खरेदी केल्या.एक रती शी लग्न होण्यापूर्वी आणि एक लग्न झाल्यावर. आता असा विचार करुया की त्याने मैथिलीला सुद्धा रिव्हॉल्व्हर दिली असेल का?शक्यता आहे कारण ती खूप प्रवास करायची.तिची मित्र मंडळी सुद्धा होती खूप.तिच्या संरक्षणासाठी त्याने रिव्हॉल्व्हर दिली असावी. ” “ पण सर,त्याने एक रिव्हॉल्व्हर रतीला दिली होती.” सौंम्या म्हणाली. “ बरोबर आहे,एक रतीला दिली होती,पण तिला त्याचा नंबर माहिती नाहीये.म्हणजे तिच्या दृष्टीने विचार केला तर तिला एक रिव्हॉल्व्हर मिळाली, नंबर बघायची गरजच तिला कधी भासली नाही.” पाणिनी म्हणाला.