कूकरची आत्मकथा

  • 4.7k
  • 1.6k

'आ हो ह्यो हो' भारत स्टील्स मधील शोकेस मधल्या कुकर ने मोठ्याने आळस दिला आणि आळस देत देता त्याचा धक्का लागला त्याच्या जवळच बसलेल्या बारक्या कढईच्या कानाला. कढई लगेच करवादली, 'काय हो कुकर मामा जरा आवरता आळस दया ना माझ्या कानाला केवढा धक्का लागला' 'बरं बाई! तूच तेवढी धिटूकली राहिली होती मला शिकवणारी. एकाच जागेवर बसून बसून अंग अगदी अकडून गेलं माझं, तुला काय कळणार मोठ्यांच्या व्यथा. तुझं बरं आहे मालक जेव्हा फडकं मारतो रोज आपल्यावरची धूळ झटकण्यासाठी तेव्हा तू जागच्या जागेवर गोल गोल फिरून तरी घेते पण माझं काय! मला बुड हलवायला सुद्धा जागा नाहीये या जागेत. डावीकडे तू