गादीचा वारस

  • 5.5k
  • 2.3k

गादीचा वारस श्रावण मास म्हटला की मनाला फारच रंग येतो.पाऊस पडतो.तद् वतच सोनेरी किरणंही पडतात.कधीतरी इंद्रधनूही आकाशात दिसतो.त्याचबरोबर मनात एक तरलता निर्माण होते.अशीच तरलता गोरखपूर नगरीत होती. कपिलवस्तू नावाचं ते गाव होतं.या नगरीतील राजा अंबरनाथ फारच क्रोधी होता.कोणालाही कोणतीही केव्हाही कशीही शिक्षा देण्यात त्याला धन्यता वाटत असे. आनंदही होई. याच गावात किसन नावाचा माणूस राहात होता.तो अत्यंत दयाळू व कृपाळू होता.कधीकधी त्यांना क्रोधही येत असे.पण क्रोधावर मात करुन किसन जगत होता..त्याला एक मुलगाही होता.त्याचं नाव कुशाण होत.कुशाणही स्वभावाने प्रेमळ होता.हाच प्रेमळ स्वभाव राजाला खलत असे व राजा या किसनची वाट लावण्याचा विचार पदोपदी करीत असे. साविन्द राजाचा मुलगा.युवराज साविन्दाला वडीलाच्या