शेतकरी महत्वाचे?

  • 3.3k
  • 1
  • 1.3k

शेतकरी, मजूर महत्वाचे? निवडणूक निःपक्ष व निःशुल्क व्हावी. अर्थात कमी पैशात व्हावी व दोनच पार्ट्या उभ्या राहायला हव्यात. इतर पार्ट्या नकोतच. अलीकडे निवडणूक पाहिली की लाखोच नाही तर करोडो रुपयाचा धुव्वा उडवला जातो. सरकार तर निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी पैसा लावत असते व्यतिरिक्त निवडणूक लढणारे लोकप्रतिनिधीही पाण्यासारखा पैसा निवडणुकीसाठी खर्च करीत असतात. त्याचं कारणही तसंच आहे. कारण निवडणूक म्हटली तर त्याला पैसे खर्च केल्याशिवाय पर्यायच नाही. लोकं दारु अन् पाचशे रुपयाच्या नोटिसा महत्व देतात. म्हणतात की ह्या नेत्यांना आताच लुटा. मग हे सापडणार नाहीत. तसं सांगायचं झाल्यास तेही मानणं काही चूक नाही. बरोबरच आहे. कारण हे नेते पाच वर्षपर्यंत कधीच आपल्या