चोरीचे रहस्य - भाग 5 - (अंतिम)

  • 10k
  • 5.3k

कुलकर्णी काकूंनी दार उघडलं. "काकू तुमच्यासाठी माझ्या काकूंनी हे भोकराचं लोणचं पाठवलं,तुम्हाला आवडते नं ", मी म्हणालो. "हो हो , अरे ये नं बस ,अरे व्वा हा चिंटू पण आलाय वाटतं तुझ्यासोबत",कुलकर्णी काकू चिंटु कडे कौतुकाने बघत म्हणाल्या. थोड्या गप्पा झाल्यावर चिंटूने मला कानात सांगितलं तसा मी थोडं मोठ्याने त्याला म्हणालो,"अरे ,थोडं थांब बाजूलाच तर घर आहे आपलं ,येईल आई किंवा आजी बाहेर " "का,काय झालं ,काय म्हणतो चिंटू ?",कुलकर्णी काकू "काही नाही त्याला टॉयलेट ला जायचं आहे पण आमच्या कडचे दोन्ही बाथरूम्स व्यस्त आहेत म्हणून त्याला म्हंटल थांब थोडं ",मी "अरे,त्यात काय,जाऊ दे न त्याला आमच्या कडच्या बाथरूममध्ये",कुलकर्णी काकू