चोरीचे रहस्य - भाग 4

  • 8.8k
  • 5.5k

तो दिवस त्याच चर्चेत पार पडला. दुसऱ्यादिवशी सकाळी पोलीस आणखी एका माणसाला घेऊन आले. आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या फ्लॅटवासीयांना कॉमन एरिया मध्ये बोलावले. "हा बघा तुम्ही वर्णन केल्यानुसार हा व्यक्ती आम्हाला सापडला पण हा कुरिअर बॉय नसून इथून जवळच काही अंतरावर असलेल्या चौकात पाणीपुरी गाडी चालवतो. हाच आहे न तो?",पोलीस भाले काकूंना म्हणाले. "काय माहीत ? मी त्या दिवशी ओझरता बघितला होता. साधारण असाच होता.",भाले काकू "हाच असेल तो पाणीपुरी च्या आड लक्ष ठेवत असेल आणि मग कुरिअर बॉय म्हणून चोरी करत असेल! काय रे बरोबर बोलतो न मी",पोलीस त्या माणसाचा हात पिरघळत म्हणाले. "मेलो मेलो साहेब हात तुटेल