चोरीचे रहस्य - भाग 2

  • 9.2k
  • 6.1k

सगळ्या फ्लॅट्समधील सदस्य ग्राउंड फ्लोअर ला कॉमन एरिया मध्ये जमले होते. तिथे जाता जाता पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली. सगळ्यात आधी त्यांनी फर्स्ट फ्लोअर वरच्या फ्लॅट पासून म्हणजे माझ्या काकांपासून सुरुवात केली. "आपलं नाव समजू शकेल का?",पोलीस "मी जयवंत कल्याणी! ",काका "तुम्ही कोणाला अपार्टमेंटमध्ये येताना जाताना बघितलं का ? कोणी संशयास्पद वगैरे?",पोलीस "नाही आम्ही घरात होतो आणि दुपारची उन्हाची वेळ असल्याने कुलर सुरू होता त्यामुळे काहीच आवाज आला नाही.",काका त्यानंतर त्यांनी 2nd फ्लोअर वरच्या श्री व सौ कुलकर्णींची चौकशी केली. "हो तुमचं बरोबर आहे नेहमी ते आमच्याकडे किल्ली ठेवतात पण आज काही त्यांनी किल्ली ठेवली नाही. आणि आम्ही कोणालाही वर येताना