चोरीचे रहस्य - भाग 1

  • 14.9k
  • 1
  • 8.3k

उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विदर्भात माझ्या काकांच्या गावी गेलो होतो. काकांना दोन अपत्ये आहेत. माझा चुलतभाऊ माझ्याच वयाचा आहे आणि माझी चुलतबहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. तिचे लग्न झाले आहे, तिला एक मुलगा आहे. सुट्टीमध्ये ती पण मुलाला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे काकांकडे आली होती. रोज आमचा वेळ गप्पांमध्ये,आंबे,आईस्क्रिम, कुल्फ्या खाण्यात कसा जात असे कळतही नसे. त्या दिवशी असेच आम्ही सगळे आमरस-पुरी खाऊन दुपारी कुलर च्या गार हवेत झोपलो होतो. जेमतेम तासभर झाला असेल की मला काका-काकूंच्या बोलण्याच्या आवाजामुळे जाग आली. काकू,काकांना सांगत होती "अहो ऐकलं का! पांडे काकूंकडे चोरी झाली!" "ककाय!! कधी??",काका "अहो आत्ता भरदुपारी झाली. ते तासभरासाठी बाहेर