मर्डर वेपन - प्रकरण 7

  • 5.2k
  • 3.1k

मर्डर वेपन प्रकरण ७सँडविच खाऊन झाल्यावर सौंम्या सोहोनी गती च्या खुर्चीवर जाऊन बसली आणि दहाच मिनिटांनी पाणिनी चा इंटरकॉम वाजला.“ मी रिसेप्शनिस्ट सौंम्या बोलत्ये,” मुद्दामच ती मिस्कीलपणे म्हणाली. “ बाहेर अंगिरस खासनीस नावाचे गृहस्थ आलेत.त्याचं म्हणणं आहे तुम्ही त्यांना बोलावलं आहे.”“ घेऊन ये त्यांना आत.”एक उंचपुरा,पस्तीशीचा माणूस, अंगात गडद रंगाचा सूट घातलेला,काळेभोर केस, पाणिनी समोर आला.दोघांनी शेक हँड केला.“ बसा.” पाणिनी म्हणाला. तो पाणिनी समोरच्या गुबगुबित खुर्चीत बसला. “ मला काही माहिती तातडीने हवी होती.मला वाटतंय तुम्ही त्यासाठी अगदी योग्य माणूस आहात.” पाणिनी म्हणाला.“ नक्कीच.मला शक्य ती सर्व माहिती देईन.” अंगिरस म्हणाला.“मला वाटतं तुम्हाला बरीच चौकशी करायची असेल पण साहेब