दिवाळीची नव्हाळी

  • 8.5k
  • 1
  • 2.7k

महाजन कुटुंब हे गुण्यागोविंदाने एकत्र पद्धतीने राहणारं असं कुटुंब होतं. विद्याधरराव महाजन त्यांची पत्नी कुमुदिनीबाई विद्याधररावांचे कनिष्ठ बंधू गंगाधरराव आणि त्यांच्या पत्नी सुहासिनी बाई. विद्याधरराव आणि गंगाधरराव हे जुळे भाऊ. आणि कुमुदिनीबाई आणि सुहासिनीबाई ह्या सख्ख्या जुळ्या बहिणी होत्या. विद्याधर राव व कुमुदिनीबाईंचे दोन मुलं भास्कर आणि पुष्कर हे जुळे होते. गंगाधरराव व सुहासिनीबाईंच्या दोन जुळ्या कन्यका इशा आणि निशा दोघींचे लग्न व्हायचे होते. भास्कर ची बायको भावना आणि पुष्कर ची बायको प्रेरणा. भावना-प्रेरणा ह्या दोघी सख्ख्या जुळ्या बहिणी होत्या. भास्कर भावना ला दोन जुळे 5 वर्षांचे मुलं होते ओम आणि सोम तर पुष्कर-प्रेरणाला दोन जुळ्या तीन वर्षांच्या मुली होत्या