असतील शिते तर जमतील भुते

  • 7.9k
  • 3.7k

अक्षरशः(शब्दशः) अर्थ: जिथे अन्नाचे कण पडलेले असतात ते खाण्याच्या मोहाने भुतं तिथे येऊन जमा होतात. गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ): जिथे काही फायदा होण्याची शक्यता वाटते तिथे लोभी लोकं आपोआप गोळा होतात. एका गावात एक प्रसिध्द वकील राहत असत. प्रल्हाद पंत म्हणून ते गावात ओळखल्या जात. बायकोच्या पश्चात ते एकटेच आपल्या घरी राहत असत. त्यांना दोन अपत्ये होते. मोठी मुलगी तिच्या नवऱ्याची नोकरी परदेशी असल्याने परदेशी स्थायिक झाली होती. आणि धाकटा मुलगा हा शिक्षण घेण्यासाठी शहरात राहत असे. शहरात शिक्षण घेतल्यावर आहे ते शिक्षण अपुरं आहे असं त्याला वाटल्याने तो वर्षभर उच्चशिक्षणासाठी परदेशी गेला. त्यामुळे प्रल्हादपंतांना नोकरांच्या भरवश्यावर गावी असलेल्या घरात एकटंच राहावं