एक पडका वाडा - भाग 4

  • 7.1k
  • 4.3k

असा विचार करून मी भिंतीला टेकली आणि माझी मान वर जाताच मला जे काही दिसलं ते एवढं अनपेक्षित होतं की माझं हृदय बंद पडते की काय असं मला वाटून गेलं. मी खुणेने रक्षाला वर बघण्यास सांगितलं. तिनेही वर बघितलं आणि तिचे डोळे विस्फारल्या गेले. वर छतावर सगळे सांगाडे लटकलेले होते. म्हणजे ते गायब झाले नव्हतेच आमच्यावर नजर ठेवून होते. आमची नजर वर जाताच ते धडाधड एकेक करून खाली कोसळू लागले. तेवढ्यात मला त्या चौथ्या मोठ्या कपाटात गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटलं कारण बाहेर पडण्याचं दार बंद होत आणि ते कपाट आत्तापर्यंत बंदच होतं ह्याचा अर्थ ते रिकामच असणार असं वाटून