कॉलेज आणि गमतीजमती

  • 5.4k
  • 1.8k

इंजिनीअरिंग मध्ये परीक्षा आणि लेक्चर्स पेक्षा दोस्तांसोबतची धमाल जास्त लक्षात राहते, हेच खरं!मुंबईतल्या माटुंगा परिसरात व्हीजेटीआय कॉलेजच्या समोर आमचं आयसीटी कॉलेज होतं. टॅक्सी वाल्याला सुद्धा व्हीजेटीआय च्या समोर आणि डॉन बॉस्को च्या बाजूला असाच पत्ता सांगावा लागायचा. मुकेश अंबानी आमचे माजी विद्यार्थी असं आम्ही अभिमानाने सांगायचो पण हॉस्टेल रूम मध्ये जिओ ला नेटवर्क ही यायचं नाही.‘मुन्ना’ कॅन्टीन वर आमची मित्रमंडळी पडीक असायची. हे कॅन्टीन मुन्नानी साधारण ५० वर्षापूर्वी सुरू केलं होतं. आता ते मुन्ना आजोबा झाले होते आणि त्यांची मुलं नातवंडं धंदा पुढे चालवत होते. परिसरातलं वडाचं झाड आणि मुन्ना यांनी किती बॅचेस निघताना पाहिल्या असतील! असो.आमची छीछोरे टोळी अशीच