करामती ठमी - 6 - ठमीचा रियालिटी शो आणि अभिनयातील नवरस

  • 7.3k
  • 3.2k

ठमीला आजकाल नवाच छंद लागला तो म्हणजे रियालिटी शो बघणे. आधी ठमी फक्त जाहिराती बघत असे. बाकी मालिकांशी तिला काही देणं घेणं नसे पण आजकाल जाहिरातींपेक्षा तिचे लक्ष वेगवेगळ्या रियालिटी शोज कडे वळलं होतं. मग नृत्याचा रियालिटी शो असो की गायनाचा, अभिनयाचा रियालिटी शो असो की विनोदाचा झाडून सगळ्या चॅनल्स वरचे रियालिटी शोज ठमी शांतपणे मांडी घालून एका हातावर हनुवटी टेकवून एकाग्र चित्ताने बघू लागली. तिचा हा एकाग्र पणा बघून तिच्या आजी-आजोबा व आई-बाबा ह्यांच्या हृदयात धडकी भरू लागली.तिचे आजोबा तर तिच्या आजीला म्हणाले सुद्धा, "पोरीने असा एकाग्रतेने अभ्यास केला तर कुठल्या कुठे जाईल." त्यावर तिची आजी म्हणे," हो न!