करामती ठमी - 5 - ठमीचे मॉडर्न आर्ट पेंटिंग

  • 5.9k
  • 1
  • 2.6k

एकदा आमच्या शाळे तर्फे एका मॉडर्न आर्ट पेंटिंग प्रदर्शनाला आम्ही सगळे शाळेचे विद्यार्थी आमच्या वर्गशिक्षकांसोबत गेलो होतो. सगळे जण एका रांगेत आम्ही जात होतो. "ऐ ढकलू नको गं मला,ती समोरची मुलगी भराभर चालत नाही त्याला मी काय करू? मला ढकलशील तर आपण सगळ्याच पडू मग मॉडर्न आर्ट राहील बाजूला ",ठमी अखंड बडबडत होती. "बरं बरं! मॉडर्न आर्ट पेंटिंग माहिती आहे का काय आहे ते!",मी विचारलं "हॅ! अगं अशी एक तरी गोष्ट आहे का जगात जी मला माहित नसेल? मला सगळं माहिती आहे!",ठमी तिरपं हसत खांदे उडवत म्हणाली. "मग सांग न!",मी "ते आपलं म्हणजे हे पहा मॉडर्न आर्ट पेंटिंग म्हणजे....ते मी