अजब विरोधाभास

  • 4.1k
  • 1.4k

प्रसंग एक:- सिग्नल चा लाल दिवा लागल्यामुळे सगळ्या गाड्या थांबल्या. एक आठ वर्षाचा मुलगा लगबगीने गारबेज बॅग्स घेऊन प्रत्येक गाडी जवळ जाऊन पाहिजे का म्हणून विचारू लागला. "कितीला आहेत?",मी विचारले. "१०० रुपयात ३ बॅग्स आहेत", त्या मुलाने सांगितले. मी त्याला १०० रुपये देऊन त्या ३ कचरा पिशव्यानच्या बॅग्स माझ्या 2 व्हिलर च्या डिक्कीत टाकून दिल्या. पिशव्यांवर खूप धूळ असल्यामुळे मी लगेच हात सॅनिटाईज्ड केले. तो मुलगा पुढे असलेल्या पांढऱ्या स्विफ्ट कार जवळ गेला. "साहेब, पिशव्या घ्या ना 100 रुपयात 3 बॅग्स", तो मुलगा "नको", गाडी चालवणारा माणूस "कुठुन-कुठून येतात ही पोरं किती अनहायजेनिक आहेत, त्यांच्याजवळच्या पिशव्यांना हात ही लावावा वाटत