मर्डर वेपन - प्रकरण 4

  • 6.4k
  • 3.5k

मर्डर वेपन प्रकरण ४ दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर सौंम्या पाणिनीला म्हणाली, “तुमच्या कालच्या लाडक्या अशिलाचा फोन आलाय सर.” तिने पाणिनी कडे फोन दिला. “ मिस्टर पटवर्धन, मला तुम्हाला तातडीने भेटायलाच हवंय” रती म्हणाली. “ तू इथे चैत्रापूर मधे आहेस?” पाणिनीनं विचारलं “ हो.” “ इथे कशी आलीस तू?” “ मी काल रात्रभर झोपू शकले नाही.मी जसजसा विचार करत होते तसतस मला तुमचं म्हणणं पटत गेलं.म्हणजे आपण एकत्र घरी जाऊन काही ...” “ काही काय?” पाणिनीनं विचारलं “ काही घडलं नाही ना ते पाहू.” “ म्हणजे?” पाणिनीनं विचारलं “ म्हणजे पद्मराग ने आजची त्याची सकाळी दहा ची अपॉइंटमेंट पाळली नसेल तर