ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 15

  • 5.4k
  • 2.6k

प्रकरण १५ “डॉक्टर तुम्हाला मी एक फोटो दाखवतो तुम्हाला ओळखता येतो का सांगा.” मोहक ने विचारले आणि पद्मनाभ पुंड चा फोटो दाखवला. “ ज्याचे मी शव विच्छेदन केले त्याचा हा फोटो आहे.” निनाद नानिवडेकर म्हणाले. “ प्रथम केव्हा पहिले तुम्ही शव?” मोहक ने विचारले “ पोलिसांनी जेव्हा त्याचे प्रेत बोटीवर पहिले तेव्हाच मला पाचारण करण्यात आले.” “ नंतर दुसऱ्यांदा कधी ?” मोहक ने विचारले. “ रविवारी सकाळी शव विच्छेदनाचे वेळी.” डॉक्टर निनाद नानिवडेकर म्हणाले. “ मृत्यूचे कारण काय होते?” “ डोक्याच्या मागे जोरात फटका बसल्यामुळे कवटीला तडा गेला आणि अंतर्गत रक्त स्त्राव झाला.” डॉक्टर म्हणाले. “ हे मी तुम्हाला अत्यंत