मृगजळ

  • 7k
  • 2.5k

मृगजळाचे उदाहरण द्यायचे झाले तर या जगा पेक्षा उत्तम उदाहरण होऊच शकत नाही. मृगजळ म्हणजे आभासी पाणी जे वाळवंटात दिसते आणि ज्याला भुलून तृष्णेने व्याकुळ झालेले लोकं,पशु,हरणं त्याच्या मागे धावतात पण त्यामुळे त्यांची तृष्णा तर शमतच नाही उलट धावल्याने उगीच दमछाक होते. हे जग म्हणजे वाळवंट असं जर समजलं तर हरणं म्हणजे या जगात राहणारे लोकं, आणि मृगजळ म्हणजे आभासी सुख ,खरे सुख समजून आपण आयुष्यभर त्यामागे धावतो पण शेवटी असमाधान कायम राहते. कोणी पैश्यामागे धावतो,तर कोणी प्रसिद्धीमागे धावतो, कोणी पदोन्नती मागे धावतो तर कोणी ऐहिक वस्तूंमागे धावतो.प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे,कोणाला मोठ्याघरात सुख वाटते तर कोणाला घरात चार पाच