अध्यात्म

  • 7.3k
  • 1
  • 2.5k

अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अभ्यास,अध्ययन करण्याचे शास्त्र. मी म्हणजे हे नश्वर शरीर नसून,मी म्हणजे आत्मा आहे असं शिकविणारे शास्त्र. दैनंदिन जीवनात आपण म्हणतो माझा हात, माझे डोके, माझे पाय, माझे शरीर, माझे मन एवढंच नाही तर माझा आत्मा असंही आपण म्हणतो म्हणजे हा 'मी' जो आहे तो कोणीतरी वेगळा आहे, मी म्हणजे ईश्वराचा अंश आहे. ह्या 'मी' ला जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म. ह्या मी मध्ये आणि हे विश्व निर्माण करणारी जी शक्ती आहे यांच्यातला दुवा, connecting link आहे आत्मा. रणांगणावर अर्जुन जेव्हा स्तिमित झाला होता, आपल्याच आत्मस्वकीयांचा वध कसा करायचा? असा प्रश्न त्याला पडला होता तेव्हा भगवान