पॉवर ऑफ अटर्नी - भाग 2

  • 6.5k
  • 4.3k

पॉवर ऑफ अटर्नी   भाग  2 भाग १ वरुन पुढे  वाचा “विभावरी तू थांब जरा, मला बोलू दे.” काकांनी विभावरीला समजावलं.   “किशोर साहेब, असं बघा, तुमच्या जवळ ते अधिकार पत्र आणि घराची सेल डिड असेलच ना ? तर दाखवता का जरा ?” काकांनी विचारलं. “मूळ पेपर बँकेत जमा केले आहेत. झेरॉक्स आहेत. एक मिनीट थांबा दाखवतो.” किशोर म्हणाला काकांनी कागद पत्रे पाहिली आणि मान हलवली. मग किशोरला म्हणाले “तुम्ही पैसे कोणाला दिले ?” “बँकेने सानिका मॅडम च्या नावाने पे ऑर्डर काढला होता. अधिकार पत्रात तसं स्पष्ट लिहिलं आहे की पैसे सानिका ला द्यावेत आणि ते मला मिळाले असे समजावे. Deemed