गोष्ट एका भयानक रात्रीची

  • 8.1k
  • 3.1k

तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होती. माझ्या कॉलेजमध्ये आमची प्रॅक्टिकल ची exam सुरू होती त्यामुळे नात्यातल्या एका लग्नसमारंभात मला माझ्या कुटूंबियांसोबत जाता आले नाही. मला दोन दिवस घरीच राहायचं होतं. नाही म्हणायला माझी मावशी जवळ राहायची. रात्री तिथे झोपायला जा असं माझ्या आईवडिलांनी मला सांगून ठेवलं होतं. मावशीने सुद्धा मला आवर्जून ये असं सांगितलं होतं परंतु माझ्या मनात एकटंच घरी राहून पाहू, आपण काय आता लहान थोडीच आहोत त्यामुळे एकटं राहायला काय हरकत आहे असा विचार करून मी घरी रात्री एकटंच झोपायचं ठरवलं आणि मावशीला खोटं सांगितलं की माझी मैत्रीण येणार आहे आज माझ्या सोबतीला त्यामुळे ती निःचिंत होती. दिवस तर