अनाथ - भाग 1

  • 11.1k
  • 1
  • 5.3k

अनाथ (कादंबरी) भाग एक अंकुश शिंगाडे ती रात्रीची वेळ होती. बहुतेक ती अमावस्येची काळी रात्र होती. बाहेर काळाकुट्ट अंधार पडला होता. वीजा चमकत होत्या. तसा पाऊस सुरु झाला. बाहेर पाऊस सुरु झाला होता. तो धो धो ही पडायला लागला होता. सदा मात्र आतमध्ये म्हणजेच घराच्या आत पांघरुण घेवून झोपला होता. तो गाढ झोपेत होता. अशातच त्याच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसा तो विचार करु लागला. कोणाचं लहान बाळ रडत असावं एवढ्या काळोख्या रात्री. त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तसा बाळाचा रडण्याचा आवाज आणखी तीव्र झाला. तो आवाज काही बंद होत नव्हता. ते पाहून सदानं दरवाज्याची कडी उघडली तर