सातव्या मजल्यावरील रहस्य - अंतिम भाग

  • 9.8k
  • 5.5k

"कारण ते कॅक्ट्स चं रोप फार दुर्मिळ होतं. विजय ने खूप शोध घेऊन ते रोप आणलं होतं",अर्पित "अच्छा असं आहे का! विजय तू कुठून आणलं हे रोप?",मी "मी नाही हो सर, आमचा दुसरा एक मित्र आहे त्याचेही नाव विजयच आहे.",विजय "अरे! असं आहे का! मग तो विजय का नाही आला पार्टी ला तुमच्यासोबत?",मी "त्याची तब्येत बरी नाहीये",राजेश "कुठे राहतो तो?",मी "तो इथून 2 किलोमिटर वर राहतो. तिथे त्याचा बंगला आहे.",अर्पित "मग असं करायचं का, आपण त्याला भेटायला जायचं का? म्हणजे मला त्याला कुंडी बद्दल विचारता येईल आणि तो आजारी असल्याने तुमचीही त्याच्याशी भेट होईल.",मी "हो चालेल आम्हालाही त्याला भेटायला जायचच